मातोश्री ग्लोबल स्कूल, कर्जुले हर्या येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा
1 min read
कर्जुले हर्या दि.२४:- मातोश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाढते पर्यावरणाचे धोके लक्षात घेऊन परंतु आपली संस्कृती परंपरा देखील पुढे चालवण्यासाठी इको फ्रेंडली गणपतीच्या मुर्त्या बनविल्या. गणेश चतुर्थी पाञसूनच दररोज विद्यार्थ्यांचे विविध ज्ञानवर्धक तसेच विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी चंद्रयानाच्या प्रतिकृती तयार केल्या तसेच सूर्यमालेतील विविध ग्रह उपग्रहांची माहिती सादर केली.गणेशोत्सवात विद्यार्थ्यांचे पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक विषयावर आधारित नाटिका, राष्ट्रभक्तीपर गित तसेच भक्तीपर गाणे, भजन, अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमात नर्सरी जुनि.के.जी. सिनि. के.जी. च्या लहान लहान बालकांनी त्यांचे नृत्य, भजन व अभंग म्हणून खूप मनोरंजन केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील चंद्रयानाच्या प्रतिकृती तसेच सूर्यमालेतील ग्रहां बद्दल सखोल माहिती गणेशोत्सवात दिली. यात अंशु निशाद,तेजस भांड, संस्कार दातिर, राधिका दाते, वंशिका झावरे, आदित्य गुंड, यशवर्धन, आराध्य, सत्यम कोल्हे, श्रुतिका, सार्थक, सृष्टी, प्रगती,दिक्षा,कल्पिता छाजेड इत्यादीं विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
गणेशोत्सवासाठी शाळेचे शिक्षक सुनील उंडे,सुनील रोकडे, विशाल डोळस, राणी रासकर, संध्या निवडुंगे, शुभांगी निमसे, प्रतिमा पवार, अश्विनी केदार, अनिता औटी, सविता भांड, प्रगती आहेर, स्नेहा झावरे, सायली पिंगट, किर्ती शिंदे, जाफर शेख फरीद पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान च्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसाद आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीरा आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सचिव किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या शितल आहेर कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.