दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात गणेश उत्सवाचे आयोजन
1 min readनिमगाव सावा दि.२४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा (जुन्नर) येथे गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ छाया जाधव यांनी दिली.महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढाकारामधून गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. पहिल्या दिवशी संस्थेचे संस्थापक व जि. प. पुणे चे मा. उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांचे शुभहस्ते मूर्ती स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय परिसर स्वच्छता करण्यात आली. तिसऱ्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डान्स स्पर्धा आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चौथ्या दिवशी महापूजेचे नियोजन करण्यात आले. सर्व प्राध्यापक आणि संस्था पदाधिकारी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि “स्वप्नवेध अनाथालय”, मंगरुळ यांच्यासाठी महाप्रसाद दिला. पाचव्या दिवशी वाजत गाजत दांडियाच्या निनादात आणि डीजेच्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष प्रयत्नातून हा उत्सव संपन्न झाला. उत्सवासाठी महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राचार्य आणि संस्था पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. योगेश शिंदे, रोहित दळे, सोहेल पठाण, किशोर येवले, साहिल पठाण, ऋषिकेश वाघ, समीर कवडे, अजिंक्य गुंजाळ, ओमकार थोरात या विद्यार्थ्यांनी प्राचार्या डॉ. छाया जाधव आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन यशस्वीरित्या पार पाडले.