मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या बाप्पाचे विसर्जन

1 min read

बेल्हे दि.२३:- इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता. जुन्नर) च्या पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन आज शनिवार दि. 23 रोजी उत्साहात संपन्न झाले. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव शाळेमध्ये संपन्न होत असतो. रोज सकाळी सर्व विद्यार्थी या बाप्पाची आरती करतात तसेच महाप्रसादाचे आयोजनही विद्यार्थी करतात. सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम शाळेतील विद्यार्थी दरवर्षी करत असतात. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत केजी च्या चिमुकल्या विद्यार्थांनी ही सहभाग घेऊन ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा घोषणा देत बाप्पाला निरोप दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे