समता गणेश मंडळाची शेषनागाची प्रतिकृती पाहायला भाविकांची गर्दी

1 min read

राजुरी दि.२१:- समता गणेश मंडळ राजुरी इंदिरानगर हे गणेश मंडळ नोंदणीकृत आहे.३२ व्या वर्षात यंदा पदार्पण करत असताना शेषनागाची हुबेहूब प्रतिकृती मंडळातील सदस्यांनी सादर केलेली आहे.सन १९९२ साली सर्वांनी एकत्र येऊन समता गणेश मंडळाची स्थापना केली.नावाप्रमाणेच समतेचा संदेश देणाऱ्या या मंडळामध्ये सर्वच जाती,धर्माचे,पंथाचे लोक त्याचप्रमाणे बाराबलुतेदार एकत्रितपणे दरवर्षी श्री गणेशाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूजा अर्चा करतात. दरवर्षी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, राजकीय, उपदेशपर, लोककलेवर आधारित,पारंपरिक,लोकजागृतीपर विषयावर आधारित असे नवनवीन देखावे हे मंडळ साकारण्याचा प्रयत्न करते.यापूर्वीही नेहरू युवा केंद्र पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान बाळगणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सपट चहा व दैनिक गावकरी या वृत्तसमूहाने समता गणेश मंडळ राजुरी यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले होते.मंडळाची स्थापना झाली तेव्हा १९९२ च्या काळात गणेशाची मूर्ती ही एक पोत्याच्या शेडमध्येच बसविली जात होती.सन २०११ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, सरपंच माऊलीशेठ शेळके, उपसरपंच एम डी घंगाळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सभापती जयंत रघतवान यांच्या निधीतून मंडळासाठी समाजमंदिर बांधण्यात आले.त्यासाठी भगवान औटी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.स्थापनेपासून ते आजपर्यंत गरुड,डायनासोर,नारळ गडवा, हनुमान,पर्णकुटी,ससा,मिनी जहाज, बदक, डोंगर, मोर अशा अनेक कलाकृतींना युक्त असे देखावे सादर केलेले आहेत.सन १९९८ मध्ये मंडळ नोंदणीकृत करण्यात आले.माजी सभापती दीपक शेठ औटी यांच्या प्रयत्नातून भजनी साहित्य,सतरंज्या व स्पीकर सेट यांचे वितरण करण्यात आले होते.तसेच या पूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई वल्लभ शेळके यांच्या प्रयत्नातून मंडळाला पारंपरिक वाद्य ढोल व ताशांचे वितरण करण्यात आलेले होते.मागील वर्षी मा.आमदार शरद दादा सोनवणे यांच्या दातृत्वातून स्वखर्चाने गणपतीचे शेड उभारण्यासाठी २.५ लक्ष रु.चा निधी मंजूर होऊन काम पूर्ण देखील झालेले आहे.दरवर्षी येथील भाविक या गणेशाला इप्सित कार्य पार पडण्यासाठी नवस करतात व हा गणेश नवसाला पावतो.मनात भाव शुद्ध असेल तर गणपती शुभ फळ देतो अशी याची ख्याती आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,दांडिया,चमचा लिंबू इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.शेष नागाची हुबेहूब प्रतिकृती व तितकीच सुंदर मनमोहक गणेश मूर्ती सर्वांचे मन वेधून घेणारी ठरली आहे.या प्रतिकृतीसाठी ऋषी पवार,प्रसाद गोसावी,सोमनाथ शिरतर,ऋषी गायकवाड,प्रदिप गाडेकर,विशाल जेडगुले,स्वप्निल जेडगुले,ज्ञानेश्वर पवार,अक्षय गाडेकर,अक्षय शिरतर,संतोष जेडगुले,निलेश गाडेकर,हेमंत गोसावी,अजय गाडेकर,अक्षय शिरतर,मयूर चव्हाण.अतुल गोरे,अनिकेत गुळवे,आदेश गुळवे,तेजस गायकवाड,गणेश ताजवे,प्रविण गाडेकर,करण औटी,मंगेश गाडेकर,गणेश गाडेकर,आकाश गुळवे,दर्शन मंडले,नामदेव पवार,रोहन पवार,दत्तात्रय जाधव,विजय गुळवे,रोहित पवार,रवी गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.मंडळाच्या या यशस्वी वाटचालीत अध्यक्ष सखाराम गाडेकर,उपाध्यक्ष सिताराम जेडगुले,सचिव भगवान औटी,खजिनदार दिनेश बनकर,सुखदेव पवार,ज्ञानेश्वर गाडेकर आणि तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे