राजुरीच्या गणेश दुध संस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व प्रति लिटर १ रुपया बोनस
1 min readराजुरी दि.२५:- राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी दुध व्यावसायिक संस्थेची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यशवंत हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, गावचे सरपंच प्रिया हाडवळे. उपसरपंच माऊली शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे, माजी अध्यक्ष गोविंद औटी, सुभाष पाटील औटी, एम.डी.घंगाळे,वल्लभ शेळके, एकनाथ शिंदे, जि.के.औटी,निलेश हाडवळे गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ, दुध गवळी सभासद उपस्थित होते.
याप्रसंगी अहवाल वर्षात शिवाजी औटी (84591) लिटर, दत्तात्रय डुंबरे (59394) लिटर,किशोर औटी(51574). विठ्ठल जाधव (51447) व अविनाश हाडवळे (50601) लिटर या शेतक-यांणी सर्वात जास्त गाईचे दुध पुरविणारे उत्पादक तसेच रंजना औटी (17801) लिटर,शिला हाडवळे (14437) लिटर, सुवर्णा औटी (11489) लिटर, बाळासाहेब औटी (9391) लिटर, आशा हाडवळे (9057) लिटर या दुध गवळयांणी म्हशीचे सर्वात जास्त दुध डेरीला घातल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संस्थेचे दुध गवळयांसाठी माफक दरात किराणा, मेडीकल, पशुखाद्य विभाग चालु असुन राजुरी दुग्धजन्य पदार्थ केंद्र चालु केलेले आहे. संस्थेला तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सहकारी उत्कृष्टता पुरस्कार २००४ मिळालेला आहे. आदर्श दुध संस्था पुरस्कार २००६, तसेच राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श दुध संस्था सहकार भुषण पुरस्कार २०१७, सहकारी सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२१ आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अहवाल वाचन संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे यांनी केले तसेच सर्व सभासदांचे आभार मानले.