मीना शाखा कालव्या वरील अडचणी सोडविण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करील:- प्रकाश वायसे
1 min read
पारगाव तर्फे आळे दि.१८:- मीना शाखा कालव्या वरील सर्व पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्याची सन २०२३/२४ ची वार्षिक सर्वसाधरण सभा पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे मीना शाखा कालव्याचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
वार्षीक सभेतील अजेंड्या वरील सर्व विषय तसेच संस्था सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या सर्व बाबीचे मार्गदर्शन झिंजाड आण्णा यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर उंडे, बाळासाहेब पठारे, रखमा निचित,फाकटे गावचे सरपंच राहुल डुकरे, संपत पानमंद यांनी आपले मनोगत व्यक्त करतानाच संस्थाच्या अडचणीही मांडल्या त्यावर झिंजाड आण्णा यांनी समर्पक उत्तरे दिली. अध्यक्षिय भाषणात प्रकाश वायसे यांनी मीना शाखा कालव्या वरील अडचणी सोडविण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करील.
फक्त आवश्यकता भासेल त्या ठीकाणी माझ्या बरोबर हजर रहा आपण सारे जण मिळुन मीना शाखा कालवा हा एक मॉडेल कालवा बनवु आसा सुंदर विचार उपस्थिता समोर मांडला.यावेळी शिरूर खरेदी -विक्री संघाचे सदस्य सपंत पानमंद , फाकटे गावचे सरपंच, २३ पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
मीना शाखा कालव्याचे सचिव पांडुरंग डुकरे यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले. तसेच पाणी वापर संस्था व शेतकऱ्यासाठी पारगाव ग्रामपंचायत नेहमीच सहकार्य करते म्हणुन सरपंच, उपसरपंच , ग्रामविस्तार अधिकारी सर्व सदस्य व कर्मचारी वर्गाचे मीना शाखा कालव्या वरील सर्व संस्थाच्या वतीने आभार मानले.