आळेफाटा मार्केटमध्ये डाळिंबाने खाल्ला भाव…! एका कॅरेटला मिळाला ‘इतका’ बाजार भाव
1 min read
आळेफाटा दि.१०:- आळेफाटा बाजार समितीत आज रविवार (दि.१०) रोजी डाळींबाच्या २० किलोच्या एका कॅरेटला मिळाला ९५०० रुपयांचा भाव मिळाला आहे, १०७ पैकी दोन कॅरेटला हा भाव मिळाला आहे. त्यामुळे आळेफाटा बाजार समितीत डाळींबाला चांगला भाव मिळाला आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक नबाजी गाडगे सचिव रूपेश कवडे, व शाखा व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आळेफाटा उपबाजारात रविवार (दि.१०) झालेल्या मोंढयात जंबो डाळींबास विस किलोच्या एका कॅरेट ला ९५०० रुपये. तर एक नंबर डाळिंबास विस किलोस ७५०० व दोन नंबर डाळिंबास विस किलोस ६५०० रुपये बाजार भाव तर तिन नंबर विस किलोस डाळिंबास ५५०० मिळाला तर चार नंबर डाळींबास २००० रुपये मिळाला असुन मार्केट मध्ये १७३२ कॅरेट विक्रीसाठी आले होते.