आजीच्या स्मरणार्थ विद्यार्थांना पुस्तकांचे वाटप

1 min read

कोळवाडी दि.२१:-कोळवाडी (आळे, ता.जुन्नर) कै.शांताबाई बबन पारवे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू प्रविण पारवे व शामभाऊ पारवे (शिवनेरी मिसळ परिवार उद्योग समूह) यांनी आजी च्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर वस्ती येथे १०० विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच केंद्र प्रमुख सखाराम कुऱ्हाडे, आळेफाटा येथील युवा उद्योजक,समीक्षा ट्रेडर्स चे प्रोप्रायटर ,गायत्री पतसंस्थेचे विद्यमान संचालक संजय गुंजाळ, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष ,विद्यमान संचालक उल्हास सहाणे,संचालक युवा नेते सौरभ भाऊ डोके.आळे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक लक्ष्मण सहाणे,उद्योजक उत्तम सहाणे,राजू पारवे, राजू सहाणे,कोळवाडी ग्रामपंचायत सदस्य अर्चना सहाणे, ललिता पारवे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीमा सहाणे,ऋषी गाढवे, सौरभ गाढवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर वस्ती चे मुख्याध्यापक व शिक्षक परिवार विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे