मातोश्री शैक्षणिक संकुलात १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान
1 min read
कर्जुले हर्या दि.२२:-कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथील मातोश्री शैक्षणिक संकुलात गणेश स्थापने निमित रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यात एकूण १०० बॅग रक्त संकलन करण्यात आले. हा उपक्रम मातोश्री आयुर्वेद कॉलेजचे वतीने आयोजित करण्यात आला होता.
यात मातोश्री शैक्षिणक संकुलातील सर्व विभागांनी सहभाग नोंदवला. त्यात मीराताई आहेर फार्मसी कॉलेज, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, मातोश्री सायन्स कॉलेज व मातोश्री ग्लोबल स्कूल यांनी सहभाग घेतला त्यात संस्थेचे सचिव किरण आहेर, डॉ. दीपक आहेर, डॉ. श्वेतांबरी आहेर, प्राचार्य शीतल आहेर, डॉ. होळकर धनश्री, डॉ गोरडे, व्यास सर, पवार सर, राहुल सासवडे, यशवंत फापाळे सर्व आयुर्वेद विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्व टिचींग स्टाफ नॉन टीचींग स्टाफ व सर्व विद्यार्थी यांचे आभार अतिशय सुंदर नियोजन केले होते.रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.