शिक्षकांचे योगदान लक्षात घेता शिक्षक – दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असला पाहिजे – सोमनाथ सायकर

1 min read

शिक्रापूर दि.६:- ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिवस सर्व भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांचा विविध भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. याप्रसंगी `शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व’ या विषयावर विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. यानिमित्ताने विद्यालयातील मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध शिक्षकांची भूमिका साकारून प्रत्यक्ष वर्ग अध्यापन केले. संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ सायकर यांनी शिक्षकांना प्रोत्साहन पर शुभेच्छा दिल्या व शिक्षकांचे योगदान लक्षात घेता शिक्षक – दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. संस्थेचे संचालक बाबुराव साकोरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या चेअरमन मनिषा सायकर , विश्वस्त शीतल सायकर,अक्षय गायकवाड, उपप्राचार्या उज्वला दौंडकर आदी उपस्थित होते.प्राचार्य गौरव खुटाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले.विद्यालयातील विद्यार्थी स्वरा कुटे, ज्ञानदा मोरे, राजवीर घोरपडे यांनी भाषणांमधून आपली कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यालयातील विद्यार्थिनी गार्गी खांडेकर व आर्या बोरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व संस्कृती आंबेकर हिने उपस्थितांचे आभार मानले. सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुशल संयोजनाने कार्यक्रम आनंदाने संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे