शिक्षक दिनी शाळेला माजी विद्यार्थ्यांने दिले दीड लाख रुपयांचे वॉटर फिल्टर मशीन
1 min read
बेल्हे दि.६ :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे (ता. जुन्नर) ला दीड लाख रुपयाचा वॉटर फिल्टर मशीन सप्रेम भेट दिला असून यामुळे शाळेतील १ हजार २५० विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे. दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आजार होतात. हे आजार टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी हे माजी विद्यार्थ्यांनी दिलेलं मशीन उपयुक्त ठरणार आहे.१९८६ ची ही माजी विद्यार्थांची बॅच असून विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये झालेल्या बैठकीत शाळेने विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याचा मुद्दा मांडला होता. यावरती माजी विद्यार्थ्यांनी चर्चा केली व जलशुद्धीकरण मशीन देण्याचं मान्य केलं.
त्यावर माजी विद्यार्थी विनय कुंजीर यांनी स्वखर्चातून सुमारे दीड लाख रुपयांचा वॉटर फिटर मशीन शाळेला शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.५ रोजी सप्रेम भेट दिला. शाळेला हे फिल्टर मशीन दिल्याने शाळेचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी विनय कुंजीर यांचे आभार मानले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ पिंकट, श्री साईकृपा पतसंस्थेचे सचिव सावकार पिंगट.
माजी सरपंच विश्वनाथ डावखर, उद्योजक विनय कुंजीर, शाळेचे प्राचार्य अजित अभंग, माजी विद्यार्थी रामकृष्ण देवकर, बाळमनिर मुजावर, शिवाजी पिंगट, संजय चंगेडिया, लक्ष्मण भांबेरे, डॉ. दत्ता खोमणे, वसंत हांडे, दावला बांगर, भाऊसाहेब गुंजाळ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.