वळसे पाटील महाविद्यालयात सेवानिवृत्त गुरुजनांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान

1 min read

निमगाव सावा दि.५:- येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक उनवणे यांच्या संकल्पनेतून आणि निमगाव सावा गावातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक गणपत घोडे, विष्णू उनवणे, भालचंद्र उनवणे, चंद्रकांत जावळे यांच्या सहकार्याने महाविद्यालयातील प्राध्यापकांचा निमगाव सावा (ता.जुन्नर) गावातील सेवानिवृत्त गुरुजनांकडून सन्मान करण्यात आला.

स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील एक दिवशिय शिक्षकांनी संपूर्ण कामकाज पाहिले. अगदी शिपाई, क्लर्क, पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्राचार्य या सर्व भूमिका विद्यार्थी शिक्षकांनी लिलया पार पाडल्या. आज खऱ्या अर्थाने या शिक्षकांनी कार्यालय आणि वर्ग व्यवस्थापन उत्कृष्टपणे पार पाडले. विद्यार्थी शिक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास यामधून जाणवला.

गाडगे गौतमी यांनी प्राचार्य पदाची धुरा उत्कृष्टपणे सांभाळली. पवन पवार,किशोर येवले,पानसरे अश्विनी, थोरात आकांक्षा, गांजवे वैष्णवी, साळवे निशा, गाडगे तेजल, गाडगे अश्विनी, थिटे सानिका, आग्रे दीक्षा,गाडगे प्रांजल, पोटफाडे वैष्णवी, हिवराळे रवींद्र, विश्वासराव आदिनाथ,गाडेकर यश, गाडेकर सुयश, भोर स्वराज, वावळ तेजस, जावळे हर्षदा, गाडगे मोनिका, शिरसाठ करण, थिटे ज्ञानेश्वरी,मोमीन अलिषा, कोरडे अक्षदा, जगदाळे प्राची, पानसरे प्राजक्ता, दळे रोहित, गाडगे वैष्णवी,पानसरे प्राजक्ता,

वाघ ऋषिकेश, पठाण सोनी, धनश्री गाडगे, सय्यद गौसिया, दिव्या गाडगे,नताशा नरवडे,मुस्कान पठाण, समरीन पटेल, श्रावणी गाडगे, प्रशिल जावळे, कुणाल डुकरे या एकदिवशीय शिक्षकांनी उत्कृष्टपणे अध्यापन केले. तसेच अजिंक्य गुंजाळ आणि योगेश शिंदे यांनी शिपाई पदाची जबाबदारी सांभाळली. अध्यापनानंतर एकदिवशीय शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आज शिक्षकाची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापनामध्ये आलेले अनुभव आपल्या मनोगता तून कथन केले.

तसेच आपल्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालय चालविण्याची अति महत्त्वाची जबाबदारी आणि ही जबाबदारी पार पाडताना आलेले सर्व अनुभव या निमित्ताने विद्यार्थी शिक्षकांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत जावळे गुरुजी आणि अशोक उनवणे यांनी विद्यार्थी शिक्षक व प्राध्यापकास मार्गदर्शन करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा संदिपान पवार, सचिव परेश घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, गणपत घोडे गुरुजी, अशोक उनवणे, चंद्रकांत जावळे गुरुजी, विष्णू उनवणे गुरुजी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, आजचे एकदिवसीय विद्यार्थी शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.छाया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे