शरदचंद्र पवार कॉलेजच्या विद्यार्थांनी लघुपटाच्या माध्यमातून अनुभवले डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र

ओतूर दि.६ – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर या ठिकाणी मंगळवार दि. ५ रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्ताने शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली व महाविद्यालयाची माहिती दर्शवणारी चित्रफीत तसेच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील अत्यंत आकर्षक असा लघु माहितीपट दाखविण्यात आला. महाविद्यालयातील शिकविण्याची सर्व कार्य विद्यार्थ्यांनी पार पाडले.
शकील हलवाई हा विद्यार्थी प्राचार्य तर सर्फराज इनामदार हा विदयार्थी संगणक विभागप्रमुख व हेमर्षी महाले ही विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स विभागप्रमुख तर बालेश्वरी नांगरे ही मेकॅनिकल विभागाची विभागप्रमुख व जयदीप नवले या विद्यार्थ्यांने प्रथम वर्ष समन्वयक म्हणून काम पाहिले.
आयुष पोटे, धनश्री कांबळे, सुमित येवले यांनी शिक्षकांची भूमिका निभावली.त्यामध्ये हेमर्शी महाले हिची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. तिचा सत्कार महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ सुनील खताळ व डॉ मोनिका रोकडे यांच्या सॉफ्टवेअर आणि टेस्टिंग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कुमारी पूजा गवळीने आपल्या मनोगतामध्ये आपल्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले त्या अनुषंगाने आमची सर्व विषयांची उजळणी झाली असे सांगून सर्व विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले.प्राचार्यांची भूमिका पार पाडलेल्या शकील हलवाई या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतामध्ये मला या पदाची भूमिका पार पाडत असताना खूप आनंद झाला.
तसेच या पदाची जबाबदारी सांभाळताना शिक्षकांकडून काम करून घेणे किती अवघड काम असते याचा अनुभव आला. असे त्याने सांगितले तसेच सर्वांनी मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले
कार्यालय अधीक्षक विशाल बेनके यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख करून दिली. व सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थी ज्यांनी प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक यांची भूमिका निभावली त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंदराव खरात यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका करताना ती कशाप्रकारे आदर्श करता येईल याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी अधिक मेहनत घेऊन यश संपादन करावे हीच गुरुदक्षिणा होय असे आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी जयदीप नवले या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थ्यांची व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.