विद्यार्थ्यांनी शिस्त हा धर्म आहे असे समजून शिक्षण घेतले पाहिजे – जितेंद्र गुंजाळ
1 min read
नारायणगांव दि. ६ :- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहुन स्वावलंबी होण्यासाठी जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग (ता.जुन्नर) हे त्याच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी जयहिंद शैक्षणिक संकुल नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्य विकासाला पाठबळ दिले जाईल.
असे मत जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात विद्यार्थ्याने शिस्त हा धर्म आहे हे प्रामुख्याने अंगीकारले पाहिजे असे बोलून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः प्रोजेक्ट बनवला पाहिजे व अडचणी असतील तर संबंधित शिक्षकांची मदत घेतली पाहिजे असे मार्गदर्शन गुंजाळ यांनी केले.
जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग कुरण मधील प्रथम वर्ष विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वागत समारंभ नुकताच पार पडला यावेळी ते बोलत होते. ललित पवार, (हेड ऑपरेशन विशनटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे) यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर जाण्यासाठीचा मूलमंत्र देऊन एटीट्यूड आणि स्किल कसे महत्त्वाचे असतात व त्यातील फरक अगदी सोप्या भाषेत सहजतेने सांगितला.
वैभव शेटे (बिझनेस एक्सलन्स स्पार्क मिंडा चाकण) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्कारातून माणूस मोठा होऊ शकतो परंतू त्यासाठी योग्य मार्गदर्शक व पाठबळ मिळणे महत्त्वाचे असते हे मार्गदर्शन व पाठबळ जयहिंद शैक्षणिक संकुलात मिळत आहे याचा आनंद वाटतो.
तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये जर सुसंवाद असेल तर विद्यार्थ्यांची सर्वांगीन प्रगते होते हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने येणाऱ्या काळात प्लेसमेंट आणि कंपनीसाठी सॉट अनालिसिस केले पाहिजे विद्यार्थ्यांच्या जीवनात त्याला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचे माहेरघर आहे असे उद्गार त्यांनी काढले.
तसेच येणाऱ्या काळात अनेक दर्जेदार इंजिनिअर तयार होतील व जयहिंद कॉलेजचे नाव देश विदेशात घेऊन जातील यात शंका वाटत नाही, असे बोलून त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. लीना पाठक तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. स्वप्निल पोखरकर. आयटीआयचे प्राचार्य सुभाष आंद्रे, प्रथम वर्षे समन्वयक प्रा. वाल्मीक घोलप तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. के एस फड व प्रा. वाय एल मंडलिक यांनी केले .