जयहिंद स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कृष्ण जन्माचा सोहळा
1 min read
नारायणगांव दि.७:- जयहिंद इंटरनॅशनल स्कुल व ज्यु. कॉलेज कुरण (ता.जुन्नर) च्या बालगोपाळांनी कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेषभुषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी थर रचून दहिहंडी फोडली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी श्रीकृष्ण प्रतिमेचे पुजन केले. संचालिका अंजली गुंजाळ, इंदूमती गुंजाळ, डॉ शुभांगी गुंजाळ प्राचार्य डॉ. किरण पैठणकर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना याप्रसंगी प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.