गुळंचवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी झाले शिक्षक

1 min read

गुळंचवाडी दि.७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे शिक्षक दिनानिमित्त इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत काम करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी गणित व इंग्रजी विषयांचे अध्यापन केले. काल संध्याकाळी सहावी व सातवीच्या मुलांना सांगण्यात आले की उद्या तुम्ही मुख्याध्यापक उपमुख्याध्यापकाची शिक्षकाची,मॅडमची भूमिका करायची आहे. मुले आनंदाने तयार झाली व त्या पद्धतीने त्यांनी लगेच तयारी ही केली. त्या दिवसासाठी मुख्याध्यापक सार्थकी शिंदे हिने पदभार सांभाळला उप मुख्याध्यापक म्हणून मयंक भांबेरे यांनी भुमिका आज दुपारच्या वेळेपर्यंत सर्वांनी मन लावून अध्यापन केले. दुपारी जेवणात मसाले भात व लाडू असा बेत ठेवण्यात आला. सायंकाळी चार नंतर सर्व शिक्षकांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व विद्यार्थ्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाबद्दल व सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एक वेगळा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निरागस

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे