समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

1 min read

बेल्हे दि.७:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (ता.जुन्नर) या सी बी एस ई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला.५ सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समर्थ गुरुकुल मध्ये या दिवशी इयत्ता ९ वी, १० वी ,११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले व दिवसभर शालेय कामकाज पाहिले. यामध्ये या दिवसाचे प्राचार्य म्हणून तन्मय गलांडे व पर्यवेक्षक म्हणून समर्थ शेळके यांनी व इतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाची भूमिका पार पाडली.

या शिक्षक दिन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले जिल्हा परिषद खडकवाडीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, रोटरी क्लब नारायणगाव, जुन्नर तालुका पालक शिक्षक संघाचे माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ सातपुते हे होते.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

सर्व विद्यार्थी शिक्षकांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व शिक्षकाचे नाते कसे असावे हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. संकुलातील इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक, बीसीएस, आयटीआय, एमबीए, जुनियर कॉलेज,लॉ कॉलेज या सर्वच महाविद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सूत्रसंचालन सार्थक आहेर यांनी प्रास्ताविक पर्यवेक्षक हरिचंद्र नरसुडे यांनी तर आभार वेदिका बेल्हेकर हिने केले.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रामचंद्र मते व शीतल पाडेकर आणि सहभागी विद्यार्थ्यांनी केले.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,संचालिका सारिका शेळके यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे