मातोश्री संकुलातील आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रेखाटल्या मानवी शरीर रचना

1 min read

कर्जुले हर्या दि ८:-मातोश्री शैक्षणिक संकुल कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथे मातोश्री आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल व संशोधन केंद्र यांचे वतीने दि.१ सप्टेंबर रोजी वैद्यकीय च्या मानवी शरीर रचना या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला दुपारी १ ते ४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा आयोजनात सदर कार्यक्रमात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिरा आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे, हे उपस्थित होते. व महाविद्यालाच्या प्राचार्या डॉ धनश्री होळकर यांनी निकाल जाहीर केला. या मध्ये डॉ दिपक आहेर अशा स्पर्धा मधून विदयार्थीच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. असे कार्यक्रम महाविद्दयालयात वारंवार आयोजित करावेत असे सुचविले. सदर कार्यकम आयोजन डॉ.धैर्यशील केवाल आणि डॉ. दीक्षा माने यांनी केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे