राजुरीत शासन आपल्या दारी उपक्रमास नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद

राजुरी दि २७: – एकाच ठिकाणी नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान शासनाच्या वतीने राबविले जात असुन त्याचा एकदिवशीय कार्यक्रम राजुरी (ता.जुन्नर) येथे घेण्यात आला. सर्व कार्यालयामार्फत देणेत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे लाभार्थीना ग्रामस्तरावर एका छताखाली देता येणेकामी सर्व कार्यालयामार्फत राबविणेत येणाऱ्या कल्याणकारी योजनांचे एकत्रितकरण करुन लाभ देणे हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे.सदर उपक्रमामध्ये ग्रामपंचायत, महसुल, कॄषि, आरोग्य,आपले सरकार सेवा केंद्र, शिक्षण, महिला बालकल्याण, बांधकाम , पाणीपुरवठा, आरोग्य, वन व इतर शासकीय विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. दिवसभरात एकुण 367 अर्ज प्राप्त झाले असुन एकुण 752 ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
शासनाच्या या उपक्रमाचा नागरीकांना चांगला फायदा होत असून यामार्फत शासनाच्या विविध योजनेसाठी लोकांना हेलपाटे न मारता एकाच ठिकाणी सर्व योजनेचा लाभ होत आहे. याबाबत नागरिकांनीही सतर्क असणे आवश्यक असल्याचे असे मत युवा नेते वल्लभ शेळके यांनी व्यक्त केले अश्याप्रकारचा उपक्रम शासनाने दरवर्षी राबविला पाहीजेत.
सदरचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य उपक्रम असुन नागरीकांना एकाच छताखाली सर्व योजनेचा लाभ होत असल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे मत सरपंच प्रिया हाडवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपक आवटे , कार्यक्रमाचे सनियंत्रण अधिकारी एम.पी परदेशी उपअभियंता, रविंद्र होडगे अभियंता बांधकाम विभाग जुन्नर, ग्रामपंचायत सदस्य एम.डी.घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकिर चौगुले,गौरव घंगाळे, मिना आवटे, सुप्रिया औटी, शितल हाडवळे, निर्मला हाडवळे.
राजश्री रायकर, सुवर्णा गटकळ किशोरी औटी, रुपाली औटी, युवा नेते वल्लभ शेळके, रामदास औटी, रवींद्र हाडवळे, ग्रामविकास अधिकारी एस.आर बाळसराफ, तलाठी धनाजीराव भोसले, गावातील सर्व शासकीय कर्मचारी, सर्व बँकेचे अधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ तर आभार तलाठी धनाजीराज भोसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत राजुरीने विशेष परिश्रम घेतले.