भगवती माता विद्यालय, नांदुरखंदरमाळ जिल्हा परिषद शाळा व विद्यालय यांची शुभम तारांगण हरित गृहप्रकल्पला सदिच्छ भेट
1 min read
आळेफाटा दि.२६:-भगवती माता विद्यालय, नांदुरखंदरमाळ जिल्हा परिषद शाळा व विद्यालय यांनी शुभम तारांगण हरित गृहप्रकल्पला (आळेफाटा ता.जुन्नर) सदिच्छ भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.शुभम तारांगण हा पर्यावरण पूरक हरित गृहप्रकल्प असून येथे अनेक नागरिक भेट देतात.येथील जल शुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प पहाणी ( सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया कशी चालते, प्रकल्प क्षमता किती आहे, ट्रीटेड पाणी कुठे वापले जाते इत्यादी माहिती या वेळी घेतली.तसेच कंपोस्ट खत प्रकल्प पहाणी (ओल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, कचऱ्याचे व्यवस्थापन सोसायटी मध्ये कसे केल जाते.
कंपोस्ट खत निर्मिती कशी होते, खताचा उपयोग कुठे केला जातो, प्रकल्पची खत निर्मिती क्षमता किती आहे या बद्दल माहिती घेतली.सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग कशी होते.(PV Solar) सौर उर्जेपासून पासून इलेक्टि्सिटी कशी जनरेट होते. सौर जल तपाक प्रक्रिया कशी चालते. सोसायटी मध्ये असलेल्या सुखसोईंची ( Amenities) ची पहाणी केली.
सोसायटी मध्ये security ची काळजी कशी घेतली जाते, याची शिक्षकांनी पाहणी केली.सॅम्पल फ्लॅटस ची पाहणी केली. असा गृह प्रकल्प ग्रामीण भागामध्ये उभारला असल्याने अनेक नागरिक या ठिकाणी भेट देऊन या प्रकल्पाची माहिती जाणून घेत आहेत.