श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात बेल्हेश्वर आशीर्वाद योजनेंतर्गत १४० वृक्षांची लागवड

1 min read

बेल्हे दि.२५:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालय, बेल्हे (ता.जुन्नर) व विद्यालय परिसरात सुरक्षा जाळीसह १४० वृक्षांची लागवड करण्यात आली. हे उपक्रमाचे चौथे वर्ष असून आजवर ४४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष लागवड योजनेचे प्रवर्तक सुनिल चोरे यांनी दिली.

प्रारंभी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान राज्य प्रकल्प संचालक आनंद भंडारी, जुन्नरचे तहसीलदार रविंद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, गट विकास अधिकारी शरद माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्षलागवड उपक्रमाचा सांगता समारंभ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाचे प्रकल्प संचालक आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी वृक्ष लागवडीसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या महेंद्र मटाले यांना ‘जलदाता’ तर वृक्षांची काळजी घेणाऱ्या संदेश भालेराव, आदित्य गोफणे, प्रणव टेंभेकर, आदित्य बांगर या विद्यार्थ्यांना ‘वृक्ष संवर्धक’ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सुनील गटकळ, प्रशांत पादीर, तुषार नांगरे, विकास गोसावी या शिक्षकांनी वृक्ष लागवड करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.आनंद भंडारी यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरणपूरक वृक्ष लावावेत तसेच विद्यार्थ्यांची जीवनसत्वांची गरज याच वृक्षांमधून भागवली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

शासनाच्या विविध खात्यांनी आंतरविभागीय समन्वयातून समाजपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.पंचायती समितीच्या माजी सदस्या अनघाताई घोडके, वृक्षवेध फौंडेशनचे प्रदिप गव्हाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पर्यावरण तज्ञ अंजली साठे, विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी संघाच्या सदस्या मनिषा गोसावी, शशीताई भाटे, शाळा समिती सदस्य विश्वनाथ डावखर, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू डावखर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सावकार पिंगट, जयवंत घोडके आदि मान्यवर उपस्थित होते. सुनिल चोरे या़नी प्रास्ताविक केले तर जयराम मटाले यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे