राजुरीत अपंग कल्याण निधीचे वाटप 

1 min read

राजुरी दि.२५:- राजुरी (ता.जुन्नर ) येथील एकुण १०५ अपंग लाभार्थ्यांना सन 2023 – 2024 च्या 5 % अपंग कल्याण निधीतुन 3 लाख 30 हजार 750 निर्वाह भत्त्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी अपंगाच्या असणा∙या समस्या पदाधिकारी यांनी समजुन घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले.

अपंगाच्या योजेनेबाबत ग्रामविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. अपंगाच्या जास्तीत जास्त योजना राबवुन त्याचा लाभ अपंग बांधवाना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत गावाच्या सरपंच प्रियाताई हाडवळे यांनी व्यक्त केले अपंगाच्या वतीने अयुब पठाण यांनी मत व्यक्त केले. यावेळी ग्रामनेते दिपक आवटे, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके,

माजी सरपंच व विद्यमान सदस्य एकनाथ शिंदे, एम डी घंगाळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, चंद्रकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकिर चौगुले, गौरव घंगाळे, मिना आवटे, शितल हाडवळे, सुप्रिया औटी, निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, किशोरी औटी, रुपाली औटी, बाळसराफ भाऊसाहेब, नितिन औटी व गावातील सर्व अपंग बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे