रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल च्या अध्यक्षपदी विजयकुमार आहेर

1 min read

आळेफाटा दि.२५:- आणे (ता.जुन्नर) चे विजयकुमार आहेर यांची रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल च्या अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली असून पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ साईलीला गार्डन मंगल कार्यालय यात संपन्न झाला. या वेळी ठिकाणी प्रांतपाल थ्री वन थ्री वन मंजू फडके , उपप्रांतपाल सचिन घोडेकर, श्रीप्रकाश बोरा, युवा नेते अमित बेनके यांच्या उपस्थितीत पार पडला.

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या अध्यक्षपदी विजयकुमार आहेर,उपाध्यक्षपदी संभाजी हाडवळे, सचिव पदी पराग गांधी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष ज्ञानेश जाधव यांनी विजयकुमार आहेर यांना चार्टर व कॉलर देऊन अध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली तर नूतन सेक्रेटरी पराग गांधी यांना संभाजी हाडवळे यांनी कॉलर देऊन सचिव पदाची सूत्रे सोपवली.

तर माजी उपाध्यक्ष विजयकुमार आहेर यांनी नूतन उपाध्यक्ष संभाजी हाडवळे यांना उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला. व नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव यांना शुभेच्छा दिल्या. पदग्रहण समारंभ कार्यक्रम प्रसंगी विजयकुमार आहेर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसपुर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर पुरिफायर देण्यात आले.

तसेच अंगणवाडी वाळुंजवाडी या ठिकाणी सुद्धा एक वॉटर प्युरिफायर देण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शंभर दप्तरे वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांना 500 वह्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बुलेटिन करण्यात आले. प्रांतपाल मंजू फडके यांनी उपस्थितांना संबोधित करताना असे म्हटले की रोटरी ही पूर्ण जगात कार्यरत असून सर्वसामान्यांसाठी तिनेही कार्य करत आलेली आहे. यासाठी आपण सर्वांनी रोटरीचा एक भाग झाले पाहिजे व समाजातील सर्व जणांना मदत केली पाहिजे म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांनी रोटरीचे सदस्य व्हावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चंगेडिया व रामदास देशमुख गुरुजी यांनी केले.

प्रास्ताविक माजी सेक्रेटरी संभाजी हाडवळे यांनी केले. नवीन सदस्यांची ओळख सेक्रेटरी पराग गांधी यांनी केली. यावेळी ज्ञानेश जाधव माजी अध्यक्ष विजयकुमार आहेर नूतन अध्यक्ष सचिन घोडेकर उपप्रांतपाल मंजू फडके प्रांतपाल श्रीप्रकाश बोरा अध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे आभार पराग गांधी यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्कृष्टपणे यशस्वी झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे