रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल कडून का न्होबा डोंगरावर वृक्ष लागवड
1 min read
आळेफाटा दि.२४:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा (ता.जुन्नर) सेंट्रल,भारतीय जैन संघटना पुणे विभाग, बजरंग ग्रुप आळे, हिरोजी इंदुलकर प्रतिष्ठान शिवजन्मभूमी पुणे, जिल्हा रिटेल व्यापारी संघटना जुन्नर तालुका, पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कानोबा डोंगरावर वृक्षारोपण व मंदिराचे ध्वजारोहण शनिवार दिनांक 22 रोजी करण्यात आले.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे पंकज चंगेडिया व अमोल मशिनरीचे प्रोप्रायटर अक्षय शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वड,पिंपळ, सोनचाफा व इतर रानटी वृक्षांची लागवड करण्यासाठी 50 वृक्ष भेट देण्यात आले. या सर्व वृक्षांची लागवड रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विनयकुमार आहेर, हेमंत वाव्हळ, पंकज चंगेडिया, अक्षय शिंदे,अंकुश शिंदे तुषार शिंदे, निलेश भंडारी, राहुल शेलार, सौरभ बोरा डॉ नागेश हिंगमिरे.
सागर लामखडे व इतर सर्व रोटरीयांस बरोबर बजरंग ग्रुप आळे या ठिकाणी असणारे सर्व सदस्य भारतीय जैन संघटना पुणे विभागाचे सर्व सदस्य हिरोजी इंदुलकर प्रतिष्ठान शिवजन्मभूमीचे सर्व सदस्य पुणे जिल्हा सेंट्रल व्यापारी संघटना जुन्नर तालुक्याचे सर्व सदस्य पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने शनिवारी सकाळी सात वाजता वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला व त्यानंतर कान्होबा मंदिराचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.