चाळीशीचा उंबरठा फेसबुक वरील एक नामवंत ग्रुपचा पुणे विभागाचा स्नेहमेळावा संपन्न

1 min read

पुणे दि.२४:- चाळीशीचा उंबरठा फेसबुक वरील एक नामवंत ग्रुपचा पुणे विभागाचा स्नेहमेळावा संपन्न दि 23 जुलै रोजी 75 सभासदांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.चाळीशीचा उंबरठा या फेसबुक टू व्हाट्सअप टू फिजिकली गेट टुगेदर या कार्यक्रमाची खरी शान वाढविली ती वय वर्ष 75, 34, 24, 22,16 या वयोगटाच्या व्यक्तींनी, ह्यांच कौतुक कराव तेवढं कमीच आहे.एकमेकांशी मैत्रीची जोडलेली नाळ, एक मित्रत्वाची अथांग साथ जोपासण्यासाठी सिल्व्हर स्टार हॉल, अंकराज हॉटेल समोर, खडी मशीन चौकजवळ, कोंढवा पुणे येथे यथोचित जमा झाले होते.महाराष्ट्रभरातील तब्बल 3 लाख 88 हजार सभासद संख्या असलेल्या ह्या ग्रुपच्या पुणे विभागातील चाळीशीच्या पुढील वयोगटातील सभासदांनी एकमेकांना भेटून सुख दुःखाची देवाणघेवाण करत एकमेकांना भेटण्याचा लीलया आनंद लुटला. या कार्यक्रमाचे आयोजन गौतमी शिंदे, तुषार राहुरकर, अस्लम मणियार, महेश भालेराव, राजेश पवार यांनी केले.तर सूत्रसंचालन श्रावणी बोऱ्हाडे, अनिस मुलानी, प्रशांत दपके, रायगडकर यांनी केले.देविदास साबळे, कुमार दातार, महादेव काशीद, संतोष गायकवाड सरकार, नितीन पाटील, राजेंद्र बोऱ्हाडे, भाऊसाहेब फडके,सचिन पाटील व सर्व सदस्य यांनी आपआपले विचार मांडले.एकत्र येऊन सामाजिक, विविध न्याय हक्काची व गरजवंतांची कामे या ग्रुपच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती देविदास साबळे,राजेश पवार यांनी दिली.या कार्यक्रमासाठी पुणे, संभाजीनगर, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर ,मुंबई येथील सदस्यांनी भाग घेतला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे