आणे पठारावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती; जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर

1 min read

आणे दि.२०:- जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग अद्याप कोरडा आहे. पावसाळ्याचे जून व जुलै महिना उलटून चालला आहे तरी आणे घाटात असणाऱ्या धबधब्याच्या घशा अद्याप ओला झालेला नाही.पठारभागावरील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट आलं आहे. शेतकऱ्यांनी जूनमध्ये झालेल्या थोड्या पावसावर पेरण्या करून हजारो रुपयांचे खत बी आपल्या शेतात पेरले आहे.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाअभावी जाणार असल्याचे चित्र पठरभागावर दिसून येत आहे.

पठरभागावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी,वरुंडी, सुरकुलवाडी, पेमदरा, भोसलेवाडी, कारेवाडी, आनंदवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, मठ, तूर, सोयाबीन, कांदे, टोमॅटो, आशा विविध पिकांची लागवड व पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.पावसा अभावी दुबार पेरणीच संकट या शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणचे पीक पिवळे पडले आहे. आपल्या शेतातील पीक पाण्या अभावी जळून गेल्याने जुन्नर तालुक्याच्या सीमेवरील असणाऱ्या पारनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी शेतीची मशागत केली आहे.पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी ऐकाही तलावात व बंधाऱ्यात पाणी नसल्याने पाळीव व वन्य प्राणी पाण्याच्या शोधत येथे येतात.

“पाऊस नसल्याने आणे घाटात असणारा गणेश पाझर तलाव, चोळीमायनर तलाव तसेच पठार भागावरील ८ ते ९ पाझर तलाव व बंधारे यावर्षी कोरडे ठाण आहेत. या पाझर तलावावर अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी व वन्य प्राणी आहेत त्यांचीही पाण्याची सोय या तलावातून होत असते.या तलावाने आणे घाटाच्या निसर्ग सौंदर्यात भर घातली जाते.तलाव कोरडा पडल्याने घाटाचे सौंदर्य नाहीसे झाले आहे.”

प्रशांत दाते
सामाजिक कार्यकर्ते आणे

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात आणे घाटात असणारा हा सर्वात मोठा धबधबा आहे.येथे देशातील सर्वात मोठा नैसर्गिक पूल आहे. पुलाजवळच मळगंगा मातेचं मोठं मंदिर आहे. सर्व परिसर निसर्ग रम्य आहे म्हणून या धबधब्याकडे अनेक पर्यटक येत असतात परंतु चालू वर्षी या धबधब्याच पाणी वाहील नाही. चालू वर्षी पावसाने दडी मारल्याने पर्यटक इकडे फिरकत नाहीत.

जुलै महिना उलटून गेला तरी धबधबा कोरडाच असल्याने पर्यटकांनी आणे घाटाकडे पाठ फिरवली आहे. आणे पाठरभागावर चांगला पाऊस झाला तर या धबधब्याला पाणी येते. जुन्नरच्या पश्चिम भागात असणाऱ्या दऱ्याघाट व नाणे घाटाप्रमाणे पर्यटकांची मोठी गर्दी पावसाळ्यात आणे घाटात होत असते. गेल्या वर्षी जून जुलै मध्ये या धबधब्यावर विकेंडला अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती मात्र या वर्षीचे चित्र वेगळेच आहे.

“आणे पाठरभागावर जेंव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा या धबधब्याला पाणी येत.पठार भागातील नाले भरले की ओढ्यावाटे पाणी वाहू लागते परंतु पाठरभागावर पाऊसच झाली नाही म्हणून अद्याप धबधबा कोरडा आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा ही मोठा प्रश्न आहे.”

किशोर आहेर
माजी उपसरपंच आणे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे