अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार पटेल हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
1 min read
आणे दि.२२:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार पटेल हायस्कूल आणे (ता.जुन्नर) येथे सरपंच प्रियंका दाते,पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले,अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली.यावेळी आर्या गगे या चिमुकलीने स्त्रीभ्रुणहत्या या विषयावर एकांकिका सादर केली तसेच मुलांच्या भाषणांतून अजितदादांबरोबरच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त विद्यालय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये वक्तृत्व,निबंध,रांगोळी, सायकलिंग,गायन, अभिनय इ.मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
याप्रसंगी बेल्ह्याचे केंद्रप्रमुख सोपान बेलकर,पाटीलबा गाडेकर,प्रशांत दाते, बाळासाहेब दाते,प्रभाकर गोफणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.आणे पठारचा पाणी प्रश्न आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत मांडल्याबद्दल आमदारांना धन्यवाद देताना वाढदिवसाच्या शुभेच्छा पठार विकास संस्थेच्या वतीने खजिनदार तुषार आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिल्या.तर आभार धोंडिभाऊ शिंदे यांनी मानले.