राजुरी येथील दावल मलिक दर्गा येथे भक्त निवास मागणी

1 min read

राजुरी दि.२२:- राजुरी (ता. जुन्नर) येथील हिंदू व मुस्लिम समाजातील श्रद्धास्थान असलेल्या दावल मलिक दर्गा येथे भाविकांसाठी भक्त निवास व्यवस्था होणे गरजेचे असल्याची मागणी माजी सभापती दीपक औटी ,सरपंच प्रिया हाडवळे ,उपसरपंच माऊली शेळके यांणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.या ठिकाणी दररोज पुणे ,मुंबई नाशिक, नगर व राज्यातील विविध भागातून हजारो भाविक मोठ्या संख्येने दर्शन व कंदुरी करण्यासाठी उपस्थित रहात असतात. परंतु या ठिकाणी आलेल्या दोन्ही समाजातील भाविकांना परिसरात राहण्या साठी कोणतीही सोयी सुविधा नसुन त्यातच सध्या पावसाळा सुरू असुन भर पावसातच येथील रानातच थांबुन प्रसाद बनवावा लागतो आहे.

येथील डोंगराच्या पायथ्या लगतची जागा ही वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे कोणतीही विकास कामे करताना जागेची उणीव भासते. तरी परिसरातील विविध विकास कामांसाठी वन विभागाने किमान पाच गुंठे जागा राजुरी ग्रामपंचायत ला उपलब्ध करून द्यावी. असा मागणी ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर केला असून या बाबतीत विद्यमान आमदार अतुल बेनके , माजी आमदार शरद सोनवणे व या विभागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार,वल्लभ शेळके यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून हा विषय कायम स्वरुपी मार्गी लावावा अशी ग्रामस्थांची व भाविकांची मागणी आहे. दरम्यान ही जागा कायम स्वरुपी उपलब्ध झाली तर सदर रस्त्याचे काम व स्ट्रीट लाईट हा विषय बिबट प्रवण क्षेत्रात असल्या मुळे मार्गी लागेल अशी मागणी देखील करण्यात आली आहे.तसेच या अगोदर या ठिकाणी वन विभागाच्या वतीने दर्ग्या वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आणि या पुढील काळात अजूनही विकास कामे , पाणी पुरवठा योजना , भाविकांना निवास व भोजन व्यवस्था होणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे