आयुष प्रसाद जळगावचे जिल्हाधिकारी: रमेश चव्हाण पुण्याचे नवे सीईओ;राज्यभरातील ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

1 min read

पुणे दि.२२:- राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी (दि. २१) बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली असून, त्यांच्या जागेवर मंत्रालयातील सहसचिव रमेश. एस. चव्हाण यांची नेमणूक केली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी (दि. २१) रोजी सायंकाळी उशिरा ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचाही समावेश आहे. आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

त्यापैकी एक म्हणजे, प्रशासकीय कामाकाजात सुधारणा घडवून आणली. शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्याचबरोबर १०० दिवसांमध्ये राबविले. विकासकामांचा निधी संपवण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला. कोरोनाकाळात ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळादेखील त्यांच्याच कार्यकाळात उभारण्यात आली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढत होते. विविध उपययोजना करत जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल केली. याशिवाय मुलांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमही त्यांनी आयुष प्रसाद यांची जळगावला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर, त्यांच्या जागी महसूल व वनविभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे