रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचा सोमवारी पदग्रहण समारंभ
1 min read
आळेफाटा दि.२१:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल (ता. जुन्नर) चा सन 2023 24 चे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष,सेक्रेटरी व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ सोमवार दि. 24 जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता साईलीला मंगल कार्यालय आळेफाटा येथे होणार आहे.
यावेळी अध्यक्ष म्हणून विजयकुमार आहेर, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे, सेक्रेटरी पराग गांधी हे पदभार स्वीकारणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंजूर फडके डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, श्रीप्रकाश बोरा, विजय काळभोर, सचिन घोडेकर, चारू श्रीत्री, हरीबिंदर सिंग दुल्लत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विजयकुमार आहेर व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांच्या वतीने करण्यात आले आहे.