आईवडील आणि भावांच्या स्मरणार्थ भागवत सप्ताह आयोजन
1 min read
वळती दि.२१:-आंबेगाव तालुक्यातील वळती गावचे ज्येष्ठ शिवसेना नेते बाजीराव आजाब यांनी आपले वडील महादु रामभाऊ अजाब,आई हौसाबाई ,भाऊ बाळासाहेब आणि भिकाजी महादु अजाब यांचे स्मरणार्थ वळती गावातील आपल्या घरी हभप बाळासाहेब गायकवाड यांच्या मधुर वाणी तील भागवत सप्ताह कार्यक्रम आयोजित केला असुन रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत मोठ्या संख्येने भाविक त्या संगित अभिनय, प्रसंग सादरीकरणाद्वारे होत असलेल्या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचीही सोय असते.आज या कार्यक्रमास पुणे जिल्हा संघटक प्रा.राजाराम बाणखेले,एड.अविनाश रहाणे, आंबेगाव तालुका महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा.सुरेखा निघोट, प्रा.अनिल निघोट, बाळासाहेब अजाब, बन्सी शेठ अजाब,राजु सोमवंशी , विनोद घुले, वळती ग्रामस्थ उपस्थित होते.