पी.डी.सी.सी बँकेचे आणे येथे उद्यापासून फिरते ए.टी.एम.केंद्र सुरु
1 min readआणे दि.१९:- मोबाईल एटीएम व्हॅन आणे येथे गुरुवार दि.२० जुलै पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती सोसायटीचे सेक्रेटरी निशांत दाते यांनी दिली.बुधवार दि.१९ रोजी ही व्हॅन दाखल झाली असून नागरिकांनी याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एटीएम व्हॅन सुरु व्हावी यासाठी PDCC बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे,संचालक संजय काळे, संचालिका पुज़ा बुटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आणे परिसरातील दररोज सुमारे २०० ते २५० एटीएम धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा जेणेकरून परमनंट एटीएम सेंटर आणे गावतील बँकेस मिळेल असे आवाहन शाखा व्यवस्थापक मेहेर यांनी केले आहे.
आणे व परिसरातील शिंदेवाडी, नळवणे,आनंदवाडी पेमदरा, व्हरुंडी, तसेच पारनेर तालुक्यातील काही गावांना आणे ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी सध्या एकच एटीएम कार्यान्वित असून तिथेही अनेक वेळ नागरिकांना कॅश उपलब्ध नसल्याचा दिसून येतं.जास्तीत जास्त एटीएम धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी केली आहे.
तसेच पठार भागावर PDCC बँकेचं एटीएम व्हावे अशी वारंवार मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली होती.त्यामुळे प्रायोगिक तत्वावर हे फिरते केंद्र सुरू करण्यात आले आहे.