बेल्हे – शिरूर रस्त्याचे रुंदीकरण होणार; पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नांना यश

1 min read

बेल्हे दि.२०:- बेल्हे ते शिरूर हा महामार्ग जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील साडेतीन किलोमीटर असून याची रुंदी कमी असल्याने रस्त्यावरून वाहन चालकांना मोठा त्रास होत होता. या रस्त्याची ३.३० मीटर रुंदीचा अपुरी असून या रस्त्याची रुंदी वाढवून १० मीटर करण्याची विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी प्रशासनाकडे वारंवार केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नुकतेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला असून लवकरच रुंदीकरणाला मजुरी मिळून काम सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र महामार्ग पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता ध.ना. देशपांडे यांनी दिली. या बाबत सविस्तर माहिती अशी की, बेल्हे ते शिरुर हा सुमारे ७७ कि.मी. लांबीचा रस्ता केंद्र सरकारने आपल्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक N.H ७६१ दि.६/२/२०१८ रोजी घोषित केला आहे. सदरचा रस्ता जुन्नर व शिरुर तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदरचा रस्ता जुन्नर तालुक्याची लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे. हा रस्ता ३.३० मीटर रुंदीचा असून उत्तर महाराष्ट्रातून येणारी अवजड वाहतूक याच रस्त्याने पुढे रांजणगांव MIDC कड़े जाते. रस्ता अरुंद असल्यामुळे नेहमी अपघात होतात ते टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पुल व वळण रस्ता सरळ करणे. तरी जुन्नर (पुणे) हददीतील हा रस्ता १० मीटर रुंदीकरणासह मजबुतीकरण व कॉक्रीटीकरण करणे बाबत आवश्यक तो कार्यवाही करावी अशी मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र महामार्ग पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता ध.ना. देशपांडे यांच्याकडे २०२० पासून केली होती.त्यांच्या प्रयत्नांना काही यश आल्याने नागरिकांनी पवार यांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे