रोकडेश्वर ज्वेलर्स’मध्ये १६ ऑगस्ट पर्यंत पैंजण व जोडवे महोत्सव; अधिक श्रावण मासच्या मुहुर्तावर खास सवलत
1 min read
आळेफाटा, दि. १९- दागिन्यांच्या विविध व्हरायटी व नाविन्यपूर्ण डिझाईन्स याची नियमितच उपलब्धता असलेले आळेफाटा (ता. जुन्नर) येथील रोकडेश्वर ज्वेलर्स येथे प्रति ३ वर्षाने येणाऱ्या अधिक श्रावण मासच्या मुहूर्तावर मंगळवार दि. १८ ते दि. १६ ऑगस्ट दरम्यान पैंजण व जोडवे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यास ग्राहकांचा प्रतिसादही मिळत आहे.
पैंजण महोत्सवादरम्यान मजुरीच्या दरात ३३ टक्केपर्यंत भरघोस सवलत मिळणार आहे. यावेळी आळेफाटा परिसरातील विविध महिलांनी पैंजण व जोडवे खरेदीसाठी गर्दी केली. पैंजण, जोडवे महोत्सवाची सुरुवात विविध महिलांच्या उपस्थितीत दीप प्रज्ज्वलनाने झाली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली देवकर, प्रांजली भाटे, लता वाव्हळ, सोनाली गांधी, मनीषा सोनवणे, वैशाली जाधव, निशा शेट्टी, वर्षा नरवडे, वृषाली नरवडे, वैशाली नरवडे, शैलजा नरवडे, सुवर्णा नरवडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.