प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते नळवणे येथे वृक्षारोपण

नळवणे दि.१९: नळवणे (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी या अधिकाऱ्यांच्या हस्ते आंब्याचे रोप लावून वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला.या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत नळवणे परिसरात १ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी दिली.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राम संभेराव तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.