कै. दत्तोबा तांबे यांची ४२ वी पुण्यतिथी शिरोली बोरी येथे उत्साहात संपन्न

बोरी दि.१८ : – तमाशा सम्राट लोककलावंत कै. दत्तोबा तांबे साळी शिरोलीकर यांचे राज्यात शालेय शिक्षणात गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी फार मोठे योगदान होते असे गौरोद्गार पुणे जिल्हा परिषद माजी गटनेते शरदराव लेंडे यांनी शिरोली बोरी येथे काढले. शिरोली बोरी ( ता. जुन्नर) येथे लोकनाट्यकार कै. दत्तोबा तांबे यांच्या ४२ व्या जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख भाषणात शरदराव लेंडे म्हणाले की शिरोली हे छोटे खेडे हे दत्तोबा तांबे यांच्या लोकनाट्यकलेच्या माध्यमातून राज्य देश स्तरावर किर्तीच्या शिखरावर पोहचले आहे. कै दत्तोबा तांबे यांनी महाराष्ट्र राज्य तमाशा परिषदेचे अध्यक्ष पद तसेच गावचे सरपंच पद सुद्धा चांगल्या प्रकारे भूषविले होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थाना मदत केली. तसेच गावामध्ये मंदिरांसाठी सुद्धा योगदान दिले आहे. नेफा आघाडीवर सुद्धा जवानांच्या करमणुकीसाठी केंद्र सरकारच्या वतीने लोकनाट्याचे कार्यक्रम केले. सदर पुण्यतिथी च्या कार्यक्रमाला विशाल पतसंस्थेचे संचालक सोनवणे, जयसिंग आण्णा गुंजाळ, बाबुराव खिलारी, बाबाजी सहाणे, तुकाराम डावखर, रामभाऊ सातपुते गुरुजी, राजूशेठ पोळ, कैलास तांबे, शिवाजी तांबे, विनोद तांबे, सलीम तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे