श्री कुलस्वामिनी खंडेराय देवस्थानात सोमवती अमावस्या निमित्त धार्मिक कार्यक्रम
1 min readनळवणे दि.१७:- नळवणे (ता.जुन्नर) येथील श्री कुलस्वामिनी खंडेराय देवस्थानात सोमवती अमावस्या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सहा महिन्यातून एकदा येणारी सोमवती अमावस्या खंडोबा भक्तांसाठी पर्वकाल मानला जातो.
हा पर्वकाल आपल्या कुलदैवतांचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलावर करण्यासाठी नळवणे येथील खंडोबा गडावर दर्शनासाठी शेकडो भाविकांची रीघ लागली होती. या कुलस्वामिनी खंडेराया मंदिरात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली होती. पहाटे श्रींना, मंगलस्नान व महाअभिषेक करण्यात आला सकाळी ८.३० वाजता पारंपरिक वाद्याच्या गजरात श्रींच्या पालखीची गडावरुन मिरवणूक काढण्यात आली होती.
साडेनऊ वाजता महाआरती व नैवद्य देण्यात आला.श्री कुलस्वामिनी खंडेराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वाहनांसाठी पार्किंग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच भाविकांनी खोबरे भांडाऱ्याची उधळण करत श्री च्या दर्शनाचा लाभ घेतला.असे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी सांगितले.