भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिका संपन्न

1 min read

मंगरूळ दि.१७:- वर्षावास प्रवचन मालिका 2023 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत जुन्नर तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेतील तिसरे प्रवचन पुष्प रविवार दिनांक १६ रोजी सकाळी मंगरूळ पारगाव (ता. जुन्नर) या ठिकाणी भिमक्रांती बौद्धजन सेवा संघ यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक मुंबई आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांनी भगवान बुद्ध यांचा कर्म सिद्धांत या विषयावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वाणीतून प्रवचन देऊन सर्वांना संबोधित केले. भन्ते अंगुलीमाल यांनी त्रिशरण पंचशील दिले. भिमक्रांती बौद्धजन सेवा संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.धम्म प्रवचन कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका शाखा अध्यक्ष आयु राकेश डोळस होते. अनुमोदन विजय वाघमारे यांनी दिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचार पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र भोजने यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा जुन्नर शाखा समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड झाली. समता सैनिक दल सैनिक संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष दीपक खरात व संस्कार सचिव कमलेश डोळस यांच्यासह 26 सैनिक उपस्थित होते.धम्म प्रवचन कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा पश्चिम कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले, संस्कार सचिव अतिश उघडे, प्रचार पर्यटन सचिव अरविंद पंडित, हिशोब तपासणीस रवींद्र अभंग,आंबेगाव पर्यटन सचिव अनिल अभंग उपस्थित होते. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश जनार्दन वाव्हळ,जुन्नर तालुका महिला विभाग सचिव वनिता घायतडके, सोनाली शिंदे, संस्कार सचिव एकता पंडित, संरक्षण सचिव अनिकेत घायतडके, संघटक गौतम थोरात. कार्यालयीन सचिव अजित अभंग सर, बन्सी घायतडके, आकाश घायतडके, महिला ग्राम शाखा, बेल्हे अध्यक्ष उषा डोळस,सचिव वैशाली डोळस, डॉ.आकाश भोजने, चंद्रशेखर भोजने,अतुल सोनवणे, शोभा डोळस,संध्या भोजने, सीमा भोजने, अशोक उघडे, तानाजी आस्वारे, संदीप भोजने, निलम भोजने, अनिता भोजने, सुनिता उदागे, तुकाराम भोजने, बाळासाहेब नवगिरे,बेल्हे, शिंगवे पारगाव साकोरी, पिंपरखेड, इ.गावातील तसेच मंगरूळ मधील भोजने परिवारातील बौद्ध बांधव, महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष राकेश डोळस यांनी वर्षावास व उपोसत यावर आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय बौध्द महासभा जुन्नर तालुका कोषाध्यक्ष चंद्रकांत जावळे गुरुजी यांनी आपल्या सुमधुर व विनोदी शैलीतून उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.भिमक्रांती बौध्दजन सेवा संघ मंगरूळ (पारगाव) यांचे विशेष सहकार्य लाभले. संघाच्या वतीने सर्वांसाठी भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सरणंत्तय घेऊन समारोप करण्यात आला. अतिशय मंगलमय वातावरणात वर्षावास प्रवचन मालिकेतील प्रवचन कार्यक्रम पार पडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे