पठार विकास संस्थेच्या वतीने गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

1 min read

आणे दि.१३:- पठार विकास संस्थेच्या वतीने श्री रंगदास स्वामी प्राथमिक आश्रमशाळा व पोस्ट बेसिक आश्रमशाळा आणे (ता.जुन्नर) येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अशी माहिती पठार विकास संस्थेचे सचिव विराज शिंदे यांनी दिली.यावेळी विद्यालयातील इ.५ वी ते १० वी वर्गात शिकणाऱ्या गरीब व होतकरू वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी वह्या वाटप करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनटक्के व सासवडे,भास्कर आहेर, तुषार आहेर,दत्तात्रय दाते,संपत आहेर, परमेश्वर आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे