पुणे- नाशिक प्रवास करणारांना आनंदाची बातमी; प्रवास होणार अधिक सुखकर

1 min read

पुणे दि.११:- पुणे- नाशिक प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना आनंदाची बातमी असून या मार्गावर ‘जन शिवनेरी’ ही इलेक्ट्रॉनिक बस सुविधा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेला सकाळी ५ वाजेपासून सुरु होत असून दर तासाला ही बस सुटणार आहे. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

किती असणार तिकीट दर

‘जन शिवनेरी’ बसेसचा तिकीट दर शिवशाहीपेक्षा थोडा अधिक आहे. जन शिवनेरी बसेस ५०० रुपये आहे तर शिवशाही बसेचा तिकीट दर ४७५ रुपये आहे. ही बस सेवा कमी दरात सुरु करण्यात आली आहे. अन्यथा शिवनेरीचा दर या मार्गासाठी ७०० रुपये होऊ शकतो. ‘जन शिवनेरी’ बसेस सुरु झाल्यामुळे शिवशाही बसेसची सेवा बंद करण्यात आली आहे.पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वेची सुविधा नाही. कोणाला रेल्वे जायाचे असेल तर पुणे येथून कल्याण अन् कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता ‘जन शिवनेरी’ सुरु झाल्यामुळे प्रवास आरामदायक होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे