मुरबाड च्या मिमिक्री मॅनचा राज्यात घुमतोय आवाज
1 min readमुरबाड दि.१०:- आपल्या कानाला चिरपरिचित आवाजांची ओळख असली तरी काही पडद्याआड गेलेल्या विभूतीचा जीवनपट ज्याच्या मिमिक्री तून डोळ्यासमोर साकार होतं असे स्वर्गीय दादा कोंडके , निळू फुले, नाना पाटेकर यांचे भारदस्त आवाज ज्याच्या कंठातून लिलया निघतात तो मुरबाडच्या एका खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा कुठेही कलेचे धडे न घेतलेला फक्त आणि फक्त त्या विधातेच्या कृपेने महाराष्ट्रभर स्टेज शो गाजवीत असल्याने मुरबाडच्या मुकुटात एक हिऱ्यांच कोदड जडले जडलय जणु !
तालुक्यातील आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कलेच्या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाण शहरात वास्तव्याला असलेल्या मुला मुलींचे होते परंतु मागील १० वर्षापासून मात्र ग्रामीण भागातील कलाकार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कला क्षेत्रात पुढे येऊन स्टेज शो करताना निदर्शनास येत आहे याबाबत आवर्जून दखल घेण्यासारखा तरुण कलावंत म्हणजे मुरबाड तालुक्यातील धसई जवळील एकलहरे गावातील एका शेतकऱ्याचा पोरगा आवाजाचा जादूगार, मिमिक्री मॅन म्हणून महाराष्ट्र भर ते चित्रपटाच्या झगमगत्या मायावी दुनियेत या तरुणानं एक आगळे वेगळे स्नान निर्माण केले आहे. मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या गणेश देसलेयांना लहानपणापासूनच तसेच परिसरातील व्यक्तींचे हुबेहूब आवाज काढण्याचा छंद होता तोच छंद त्यांना पुढे यशाचे शिखर गाठण्यासाठी मैला चा दगड ठरला वैशिष्ट्य म्हणजे गणेश देसले मराठी सिनेसृष्टीतील नाना पाटेकर ,अक्षय कुमार निळू फुले सयाजी शिंदे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज अगदी हुबेहूब काढतात त्याच प्रकारे ज्यांनी अनेक चित्रपट सुपर डुपर हिट आहेत. आपल्या सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांचा आवाज खूप छान काढतात. मकरंद अनासपुरे हृतिक रोशन साउथ सुपरस्टार रजनीकांत , अल्लू अर्जुन, अंकुश चौधरी ,चला हवा येऊ द्या भाऊ कदम राजकुमार ,सनि देओल निलेश साबळे ,भारत गणेशपुरे वेड चित्रपट अभिनेता रितेश देशमुख साऊथ ॲक्टर प्रकाश राज , विजय राज अशाप्रकारे शिंदेशाही आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांची सुद्धा आवाजे काढतात. राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज स्वर्गीय नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते शरद पवार, रामदास आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इत्यादी नामवंत कलाकारान बरोबरच गाजलेल्या सैराट, या चित्रपटातील, परश्या म्हणजेच आकाश ठोसर याच्या आवाजाची मिमिक्री अफलातून सादर करतात. याच गणेश देसले यांचे कार्यक्रम जुन्या नवीन शेकडो स्टेज वरती हजारोंच्या उपस्थित पार पडले आहेत. मुंबई ठाणे पालघर वाडा कर्जत नवी मुंबई अहमदनगर, पुणे, गुजरात कल्याण, मुरबाड या ठिकाणी जुने कलाकार नवीन कलाकार यांची हुबेहूब मिमिक्री करून नागरिकांना हसवणारे गणेश देसले यांची कला पाहण्यासाठी हजारो जनता आतुरतेने वाट पहतात व आनंद लुटतात.