रोटरी क्लब ऑफ आळेफाटा कडून शाळेला सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशीन

1 min read

आळेफाटा दि.९:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित -बाळासाहेब जाधव कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे, ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) मधील विद्यार्थिनींच्या सोयीसाठी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मार्फत व्हेंडिंग मशीन (सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशीन) शालार्पण – याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ आळेफाटाचे अध्यक्ष-विनायककुमार आहेर. माजी अध्यक्ष -ज्ञानेश जाधव, महावीर पोखरणा, विमलेश गांधी, संभाजी हाडवळे,हेमंत वाव्हळ, सागर लामखडे,राहुल शेलार तसेच रोटरी क्लब ऑफ आकुर्डी विभागाचे अध्यक्ष- शशिकांत शर्मा, माजी अध्यक्षा कल्याणी कुलकर्णी,विनीत कुलकर्णी सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर -गौतम शहा,जसविंदरसिंग चोखी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष- अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष -सौरभ डोके, सचिव- अर्जुन पाडेकर , खजिनदार – अरुण हुलवळे संचालक -बाळासाहेब जाधव, भाऊ कुऱ्हाडे , किशोर कुऱ्हाडे , बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे , संपत गुंजाळ ,जीवन शिंदे , कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ ,देविदास पाडेकर , सम्राट कुऱ्हाडे , रमेश कुऱ्हाडे ,शांताराम कुऱ्हाडे, प्राचार्य संदीप भवारी या सर्वांनी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून सत्कार केला.रोटरी क्लब आळेफाटा मार्फत व्हेंडिंग मशीन शालार्पण केले तसेच मुलींसाठी लवकरच आरोग्य शिबिर तपासणी आयोजित करण्यात येईल असे कल्याणी कुलकर्णी यांनी सांगितले.रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांचा नेहमीच विद्यालयासाठी मदतीचा हात असतो.असे मत किशोर कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रम ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी, कोळवाडी संचलित , विशाखा महिला तक्रार निवारण समितीमार्फत आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जाधव ,प्रास्ताविक डॉ.अरुणा वाघोले तर आभार डॉ. सविता रहांगडाले यांनी केले असून सर्व महिला शिक्षिका सदर कार्यक्रमास उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे