पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले; नाशिक फाटा ते खेडचा प्रवास वीस मिनिटात शक्य

1 min read

चाकण दि.९:- पुणे – नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मंजूर असले तरी प्रत्यक्षात सुरु होत नसल्याने नागरिकांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

मुंबई- पुणे महामार्गावरील कासारवाडी येथील नाशिक फाटा ते मोशी येथील इंद्रायणी नदीवरील पुलापर्यंत नाशिक महामार्गाची हद्द पिंपरी चिंचवड शहरात आहे. चौपदरी महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, नाही. पुणे नाशिक महामार्गाच्या अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला पट्ट्यात औद्योगिक साहित्याची जड वाहतूक, ओव्हरलोड वाहन, प्रवासी वाहने, दुचाकी यांची वाहतूक होते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

विशेषतः भोसरी, लांडेवाडी चौक ते मोशी राजा शिवछत्रपती चौक, मोशी गावठाण परिसर, चिबळी फाटा, आळंदी फाटा, चाकण परिसरात अधिक कोंडी होते. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणाची गरज आहे. नाशिक फाटा, मोशी, चांडोलीपर्यंत (राजगुरुनगर) केंद्र सरकारतर्फे एलिव्हेटेड अर्थात उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. रुंदीकरण एलिव्हेटेड झाल्यास नाशिक फाटा ते खेड अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर येणार आहे.

निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार

पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदी पुलापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार झाला असून, ते एलिव्हेटेड रस्ता करणार आहेत. त्यानंतरचा सेवा रस्ता करण्यासाठी भू-संपादन केले आहे. मात्र, सेवा रस्त्याची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे. एलिव्हेटेड रस्ता करण्यापूर्वी सेवारस्ता होणार असून, त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे