आता अविवाहितांना दरमहा २ हजार ७५० रुपये पेन्शन

1 min read

दिल्ली, दि.७ :- लग्न न झालेल्यांसाठी हरियाणा सरकारने मोठी घोषणा केली असून ४५ ते ६० वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेले नाही त्यांना हरियाणा सरकारकडून २ हजार ७५० रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे १.८० लाखांच्या आत आहे, त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे.हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज ही घोषणा केली आहे. यासोबत ज्या विधूर पुरुषांचे वय ४० ते ६० आहे. आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाखांच्या आत आहे, त्यांनाही २,७५० रुपयांची मासिक पेन्शन देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील सुमारे १.२५ लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते. राज्य सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ३००० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये येत्या काळात निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे