राजुरी गावास केंद्रीय समितीची भेट
1 min read
राजुरी दि.६:- राजुरी गावाची अवकाशीय विकास आराखडा अनुषंगाने पाहणी दौरा करण्यासाठी मा.सुनीकुमार (भा.प्र.से.) सचिव,पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांनी भेट दिली. पहाणी दौऱ्याचे वेळी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मा.मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा पुणे , मा.आनंद भंडारी संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, मा.सचिन घाडगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शरदचंद्र माळी गटविकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर तसेच विविध खातेचे अधिकारी उपस्थित होते.
गावाच्या विकास आराखड्याची सविस्तर पाहणी समिती केली, ग्रामपंचायत कार्यालय , गावातील विकासकामे , स्वच्छ बाजारपेठ , 14 वा व 15 वा वित्त आयोगाची कामे पाहून समाधान व्यक्त केले, तसेच ग्रामपंचायतच्या ऑनलाइन बँकिंग चा वापर पहावून आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. गावाचा अभ्यासपूर्ण विकास करत असताना केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन सुनीलकुमार यांनी दिले. तसेच गाव स्वयंपूर्ण करत असताना कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे व कश्या पध्द्तीने विकास केला पाहिजे याबाबतच्या सूचना सुनीलकुमार यांनी केल्या.
घरपट्टी वसुली , विकासकामे , स्त्री – पुरुष प्रमाण , घनकचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या सर्व बाबीवर सखोल मार्गदर्शन आयुष प्रसाद यांनी केले.उपस्थित ग्रामस्थांना प्लास्टिक बंदीची शपथ कलशेट्टी यांनी दिली गावातील प्रमुख मागण्याबाबत सविस्तर माहिती युवा नेते वल्लभ शेळके सर यांनी दिली , दिपक आवटे यांनी मनोगत व्यक्त केले व सरपंच प्रिया हाडवळे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी गावाचे उपसरपंच माऊली शेळके , सर्व ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.