बेल्ह्यात अवकाशीय विकास आराखडा पाहणी दौऱ्या दरम्यान ग्रामस्थांना प्लॅस्टिक बंदी ची शपथ

1 min read

बेल्हे दि.६:- अवकाशीय विकास आराखडा अनुषंगाने कामकाजाची पाहणी करण्यासाठी सुनिल कुमार (सचिव पंचायत राज, भारत सरकार) यांनी ग्राम पंचायत बेल्हे (ता.जुन्नर) येथे भेट दिली. त्यांचे समवेत मल्लिनाथ कलाशेट्टी (से.नि. भाप्रसे उपमहासंचालक, यशदा पुणे), आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प पुणे), आनंद भंडारी ( प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वरात्र अभियान), सचिन घाडगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत, जि. प. पुणे), शरद माळी (गटविकास अधिकारी, पं. स. जुन्नर) हे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे शुभहस्ते ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.सचिव सुनील कुमार यांनी ग्रामपंचयतीच्या अवकाशीय विकास आराखडा या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या आराखडयाच्या अनुषंगाने गावचा सुनियोजित शास्वत विकास होणेसाठी ग्रामस्थांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे असे मत नोंदवले.
पर्यावरणाला हानी पोहचेल अशा सिंगल वापरास बंदी घालणे. कामी ग्रामपंचायत मार्फत योग्य ती कार्यवाही करावी असे मत मांडून मल्लिनाथ कलाशेट्टी यांनी उपस्थित सर्वांना प्लॅस्टिक बंदी ची शपथ दिली. यावेळी आयुष प्रसाद, आनंद भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ग्रा. पं. सदस्य राकेश डोळस यांनी अवकाशीय विकास आराखडा चे अनुषंगाने कामकाजाची सविस्तर माहिती दिली. ग्रामस्थांचे वतीने माजी पंचायत समिती सदस्या अनघा घोडके यांनी मनोगत व्यक्त करून मान्यवर व उपस्थिताचे आभार मानले. याप्रसंगी बेल्हे ग्रा पं चे प्रशासक जयश्री बेनके, ग्रामविकास अधिकारी कल्पना दूराफे, माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, माजी उपसरपंच निलेश कणसे,बेल्हे ग्रामस्थ तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.समाधान व्यक्त केले व सर्वती मदत करण्याचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे