डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ने केला डॉक्टरांचा सन्मान
1 min read
आळेफाटा दि.३: -डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब ऑफ आळेफाटा (ता.जुन्नर) सेंट्रल ने डॉक्टरांच्या समाजाप्रती असलेली आपली कर्तव्य भावना आणि सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे अहोरात्र काम करणारे डॉक्टर्स यांच्या कामाचा गौरव म्हणून रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ने आळेफाटा येथील सर्व डॉक्टरांचा सन्मान केला.30 जून रोजी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ने आपल्या सर्व सदस्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम व क्लब असेम्ब्ली आणि डॉक्टर्स डे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष ज्ञानेश जाधव, नवीन अध्यक्ष 23-24 विजयकुमार आहेर, सचिव संभाजी हाडवळे, संस्थापक महावीर पोखरणा, असिस्टंट गव्हर्नर संजय टेंभे, खजिनदार विमलेश गांधी व रोटरी चे सर्व सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते.
यानंतर डॉक्टर्स डे निमित्त आळेफाटा परिसरातील सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉ. सदानंद राऊत, डॉ पल्लवी राऊत,डॉ मनोज वेठेकर, डॉ मनोज काचळे, डॉ. आकाश आवारी, डॉ नागेश हिंगमिरे, डॉ प्रदीप यादव, डॉ सचिन शिंदे, डॉ पुरुषोत्तम बो-हाडे आणि परिसरातील सर्वच डॉक्टर्स आपल्या कुटुंबीयांसमवेत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष ज्ञानेश जाधव यांनी वर्षभरात एक कोटी पेक्षा जास्त कामे केल्याबद्दल सर्व सदस्यांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा कार्यकाल संपला तरी पुन्हा आपण नव्या उमेदीने नवीन कामे करावी असे आव्हान केले. त्याचप्रमाणे नवीन वर्षात रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ची सूत्रे हाती घेणारे विजयकुमार आहेर यांना अध्यक्षपदाबद्दल तर सचिव पराग गांधी यांना पुढील कार्यकाळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
या सर्व डॉक्टरांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. सदानंद राऊत यांनी आपल्या मनोगतात रोटरी करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि रोटरीने यापूर्वी जुन्नर तालुक्यातील अनेक डॉक्टरांना कोरोनाच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे.
व या पुढील काळातही रोटरी अशाच प्रकारचे सहकार्य करेल अशी आशा व्यक्त केली व रोटरीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आपणही रोटरी मध्ये रोटरीयन्स असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल रोटरीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संस्थापक खजिनदार सर्व रोटरीयन्सचे आभार मानले.