आई- वडिलांच्या स्मृती पित्यर्थ हाडवळे कुटुंबियांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

राजुरी दि.२: राजुरी (ता.जुन्नर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीतील विद्यार्थांना संदीप औटी यांच्या वतीने सर्व केळी तर बबन वामन हाडवळे व डॉ.दीपक वामन हाडवळे यांच्या वतीने आई कै.दगडूबाई हाडवळे, कै.पार्वतीबाई हाडवळे वडील कै. वामन जानकु हाडवळे यांचे स्मरणार्थ सर्व विद्यार्थ्याना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपसरपंच माऊली शेळके, युवा नेते वल्लभ शेळके, तंटामुक्त समितीचे संदीप औटी, राजु हाडवळे, भाऊसाहेब कणसे, गणेश हाडवळे, गंगाराम औटी, पोलिस पाटील विठ्ठल कणसे, बबन हाडवळे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.