निमगाव सावात श्री साईकृपा पतसंस्थेच्या ७ व्या शाखेचे उद्घाटन संपन्न

1 min read

बेल्हे दि.८:- पुणे व अहिल्यानगर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या बेल्हे (ता.जुन्नर) येथील श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७ व्या शाखेचे उद्घाटन निमगाव सावा येथे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, शिवनेर भूषण हभप राजाराम महाराज जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.या वेळी माजी आमदार अतुल बेनके बोलताना म्हटले की, श्री साईकृपा पतसंस्थेचा प्रगतीचा उंचावलेला आलेख अभिमानास्पद असून पतसंस्थेने विविध शाखांच्या माध्यमातून बेल्हे व पंचक्रोशीत सहकाराचे जाळे विणले आहे.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, स्नेहल शेळके,वल्लभ शेळके, नयना गुंजाळ, मनिषा डावखर, पंकज कणसे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे पांडुरंग गाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वैभव काळे, ह.भ.प. विजय महाराज खाडे, गजानन घोडे, शहेनाज इनामदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष कवडे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण, गावचे सरपंच किशोर घोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी पतसंस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करून निमगावसावा येथे सुरु होत असलेली ही सातवी शाखा असून नियोजित रांजणी व कवठे यमाई येथे नवीन शाखा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.
सर्वसामान्य माणसांचा ठेवीदारांचा विश्वास साईकृपा पतसंस्थेने जपला आहे असे सांगून संजय काळे म्हणाले, साईकृपा पतसंस्थेचे कार्यालय, येथील अधिकारी व कर्मचारी यांचा असणारा ड्रेस कोड व टापटीपपणा निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. निमगावसावा गावचा व्यापार, उदीम वाढल्यामुळे येथे अनेक आर्थिक संस्था आल्या आहेत. साईकृपाने देखील या संपूर्ण परिसराचा सर्वे करून येथे शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या शाखेस माझ्यासह सर्व ग्रामस्थांचे सहकार्य राहिलं असे आश्वासन पांडुरंग पवार यांनी यावेळी बोलताना दिले. साईकृपा पतसंस्थेचे मुख्य कार्यालय बेल्हे येथे असून आणे, साकोरी, बोरी बुद्रुक, अळकुटी व पारगावला त्यांच्या शाखा आहेत. मुख्य कार्यालयासह सर्व शाखांमधून सर्व सभासद व ग्राहकांना सेवा देण्यात ही पतसंस्था अग्रेसर असल्याचे बाळासाहेब खिलारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!