समर्थ फार्मसी प्रकल्प तंत्रशास्त्र विद्यापीठात प्रथम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठीनिवड

1 min read

बेल्हे दि.१०:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे येथे विद्यापीठ स्तरावरील आविष्कार २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धा दोन फेर्यांमधे घेण्यात आली. प्रथम फेरी भित्तीपत्रक सादरीकरणाची होती त्यामध्ये सहा स्पर्धकांची द्वितीय फेरीमध्ये निवड करण्यात आली. त्यामधील शुद्ध विज्ञान श्रेणी पदवीधर विभाग मध्ये सानिका साळुंके – (चतुर्थ वर्षे औषध निर्माण शास्त्र, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे) च्या विद्यार्थीनीचा प्रथम क्रमांक आला वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटामुळे कृषी कचऱ्यापासून मिळवलेल्या जैवविघटनशील पर्यायांचा विकास यावर संशोधन करण्यात आले.तसेच राज्य स्तरावरील स्पर्धेच्या तयारी साठी प्रशिक्षण शिबिराचा लाभ तिला मिळणार आहे. सदर प्रकल्पाचे पेटंट सुध्दा प्रकाशित करण्यात आले आहे त्यामुळे संशोधनाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच महाविद्यालयाला चांगल्या वर्तणूकसाठी दिला जाणारा “सर्वोत्तम शिस्त पुरस्कार” समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे महाविद्यालयास देण्यात आला. आविष्कार समन्वयक डॉ.मंगेश होले यांनी विद्यार्थिनीला मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यीनीला संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर व डॉ. शरद पारखे यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!